Sambhajinagar Crime : 50 लाख, पार्टी, बाया अन् बंदूक... 8 तासांचं रक्तरंजित थरार, निवृत्त प्राध्यापकाची हत्या कशी झाली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sambhajinagar Retired Professor Murder : आरोपी विशाल राठोड याने निवृत्त प्रा. राजाभाऊ सुभराव लोंढे यांची अशा प्रकारने हत्येची प्लॅनिंग केली, एखादा वेबसिरीज देखील फिक्की पडू शकते.
Sambhajinagar Crime News : संभाजीनगरच्या ज्योतीनगर परिसरातून काही दिवसांपासून बेपत्ता झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त विभागप्रमुख राजाभाऊ सुभराव लोंढे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 50 लाख रुपयांच्या जुन्या आर्थिक वादातून त्यांच्याच बंदुकीने डोक्यात गोळी झाडून हा प्रकार घडला. गुन्हे शाखा पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणाचा छडा लावत विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या 3 आरोपींना अटक केली. पण विशाल राठोड याने अशा प्रकारने हत्येची प्लॅनिंग केली, एखादा वेबसिरीज देखील फिक्की पडू शकते.
फार्महाऊसवर पार्टी अन् सगळा प्लॅन रचला
विशाल राठोड याने सगळा प्लॅन रचला होता. घटनेची सुरुवात 5 फेब्रुवारी रोजी झाली, जेव्हा प्रा. लोंढे यांना विशाल राठोड याने पार्टीसाठी बोलवलं आणि इतर काही मित्रांसोबत दौलताबाद येथील एका फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले. 6 फेब्रुवारीच्या पहाटे विशालने त्यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याचा खोटा बनाव रचला. मात्र, लोंढे घरी न परतल्याने त्यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. महिना उलटूनही तपास लागत नसल्याने नातेवाइकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली, त्यानंतर गुन्हे शाखेने संशयितांची उलटतपासणी सुरू केली अन् पोलिसांच्याच पायाखालची जमीन हादरली.
advertisement
रिॲलिटी शोसाठी 50 लाख रुपये घेतले
पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर मुख्य आरोपी विशाल राठोड याने गुन्ह्याची कबुली दिली. एका रिॲलिटी शोसाठी विशालने लोंढे यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले होते, त्यातील 40 लाख रुपये परत करण्यावरून त्यांच्यात 3 फेब्रुवारी रोजी मोठे भांडण झाले होते. याच रागातून विशालने त्यांचा काटा काढण्याचे ठरवलं. 5 फेब्रुवारीच्या रात्री पार्टीत त्यांना दारू पाजल्यानंतर, शुद्धीत नसताना विशालने त्यांचीच बंदूक घेतली आणि साजापूर शिवारात नेऊन त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्याला इतका राग आला होता की, त्याने दगडाने ठेचून चेहरा देखील खराब केला होता.
advertisement
पार्टीतील महिलांचा जबाब अन् सीसीटीव्ही
विशालने दिलेल्या पार्टीत दोन महिला देखील होत्या, अशी माहिती समोर आली आहे. पार्टीतील महिलांनी दिलेला जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला. मी दारू पिल्यानंतर टर्राट झालो होतो, त्यानतंर मला काही आठवत नाही, असं सहआरोपी आकाशने म्हटलं होतं. तर दोघंही शुद्धीत होते, प्राध्यापक नशेत होते, असं पार्टीला उपस्थित महिलांनी सांगितलं. तर सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आकाश फ्रंट सीटवर गाडी चालवताना देखील दिसला.
advertisement
तोडक्या-मोडक्या इंग्रजीत स्टेटस
आरोपींनी मृत लोढें यांच्या मोबाइलवर तोडक्या-मोडक्या इंग्रजीत 'im in prrsonal work - 20, 25 dont disturb' असं स्टेटस ठेवलं. मात्र, प्राध्यापक असलेली व्यक्ती चुकीचे इंग्लिश लिहू शकत नाही, हे पोलिसांनी माहितं होतं, त्यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला अन् पोलिसांनी आरोपींना खाक्या दाखवल्या.
जेसीबी चालकाकडून 8 फूट खोल खड्डा करून घेतला
advertisement
दरम्यान, मुख्य आरोपी विशाल राठोडवर गुन्हेगारी विषयांवरील चित्रपट आणि वेबसिरीजचा प्रचंड प्रभाव होता. मृतदेह डिकीत फिरवणे, मोबाइल लांब नेणे आणि पोलिसांना भास होईल असे कृत्य करणे, हा सगळा कट त्याने एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे रचला होता. मृतदेह पुरण्यासाठी दोन दिवस अगोदरच 'महाराजांनी येथे गुप्त धन असल्याचे सांगितले, अशी व्थाप मारत जेसीबी चालकाकडून 8 फूट खोल खड्डा करून घेतला. त्याच जेसीबी चालकाकडून खड्डा बुजवूनही घेतला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar Crime : 50 लाख, पार्टी, बाया अन् बंदूक... 8 तासांचं रक्तरंजित थरार, निवृत्त प्राध्यापकाची हत्या कशी झाली?









