Manoj Jarange Patil: मुंबईतील CSMT समोरच्या चौकाला ‘मनोज जरांगे पाटील’ नाव द्या, कुणी केली मागणी?
छत्रपती संभाजीनगर शहरातील अताउर रहमान निसार अहमद अन्सारी (40, रा. सिटी चौक परिसर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे चार वर्षांपूर्वी शहरातील एका मुलीशी लग्न झाले होते. तेव्हापासून त्याचे शहरात वास्तव्य होते. तो टेलर म्हणून काम करून उदरनिर्वाह करत होता. त्याच काळात त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे पैसे पुरत नसल्याने त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. यात तो दारूच्या ठेक्यावर येणाऱ्या मंडळींची दुचाकी चोरायचा. चोरी केलेल्या सर्व दुचाकी तो मालेगावात मिळून विक्री करत होता. चोरीच्या दुचाकी मालेगावात पोहोचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत होता.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्या पथकाने ही कारवाई नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बसस्थानकावर केली. यात 2 लाख 45 हजारांच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.