TRENDING:

संशयास्पद हालचाल; पोलिसांनी अडवलं, रिक्षात भयंकर दिसलं, तरुणीसोबत.., सावत्र आई-बाप ताब्यात

Last Updated:

‎रिक्षातून तरुणीचा मृतदेह सापडला; सावत्र आई-वडिलांची चौकशी सुरू

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर: रिक्षातील हालचाल संशयास्पद वाटल्याने एकाने पोलिसांना कॉल केला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक कांड पुढे आले आहे. कन्नडकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. वाळूज महानगर हद्दीतील तिसगाव चौफुली येथे गुरुवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणीच्या सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
Chhatrapati Sambhajiangar: रिक्षात संशयास्पद प्रकार, थेट पोलिसांना कॉल, तरुणीचा..., सावत्र आई-बाप ताब्यात, संभाजीनगरात खळबळ
Chhatrapati Sambhajiangar: रिक्षात संशयास्पद प्रकार, थेट पोलिसांना कॉल, तरुणीचा..., सावत्र आई-बाप ताब्यात, संभाजीनगरात खळबळ
advertisement

‎माहितीनुसार, एक कुटुंब गादीमध्ये काहीतरी गुंडाळून रिक्षातून कन्नडच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एका सतर्क नागरिकाने तात्काळ डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तिसगाव चौफुली येथे रिक्षा अडवून तपासणी केली.

आईवडील मजुरीला गेले, वृद्ध आजोबा झोपलेले, 14 वर्षाच्या मुलीनं केलं असं, अख्खं गाव हादरलं!

advertisement

‎रिक्षाची झडती घेतली असता, गादीमध्ये गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह आढळून आला. याबाबत विचारणा केल्यावर सावत्र आई-वडिलांनी, “मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी नेत आहोत,” अशी माहिती पोलिसांना दिली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

‎दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की अन्य काही घातपात, याचा तपास वाळूज पोलीस करीत असून सावत्र आई-वडिलांची सखोल चौकशी सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संशयास्पद हालचाल; पोलिसांनी अडवलं, रिक्षात भयंकर दिसलं, तरुणीसोबत.., सावत्र आई-बाप ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल