वाहतूक मार्गात बदल
कन्नड, वेरुळ, खुल्ताबाद, दौलताबाद, छ. संभाजीनगर जाणारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. आता कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या जड वाहनांना कन्नड, वेरुळ, कसावखेडा फाटा, वरझडी, माळीवाडा शरणापुर फाटा मार्गे छ. संभाजीनगरकडे यावे लागेल.
छ. संभाजीनगर, दौलताबाद, खुल्ताबाद, वेरुळ कन्नडकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून आता छ. संभाजीनगर, शरणापुर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखंड फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाईल.
advertisement
फुलंब्री, सुलतानपुर, खुल्ताबाद, वेरुळ, कन्नडकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. आता फुलंब्री, छ. संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखंड फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जावे लागेल.
दरम्यान, उरूस सुरू असेपर्यंतच वाहतूक मार्गातील हे बदल कायम राहतील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 03, 2025 9:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Khuldabad Urs 2025: छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल, जड वाहनांना हे रस्ते बंद, पर्यायी मार्ग