नेमकं घडलं काय?
भाऊसाहेब शेळके हे एका ट्रॅव्हल्स कंपनीत चालक म्हणून काम करतात. त्यांच्यावर कर्ज असल्याने पत्नीच्या नावावरचा प्लॉट विकून ते पैसे भरण्याचा विचार करत होते. 21 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी याबाबत पत्नी प्रणिता यांना सांगितलं. अंबरहिल येथील प्लॉट विकून कर्ज फेडण्यास पत्नीने विरोध केला.
पत्नी-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी पडली महागात, प्रकरण अंगलट, छ. संभाजीनगरात राडा
advertisement
“तुम्ही कसे प्लॉट विकता, मी माझ्या भावाला बोलावून घेते,” म्हणत प्रणिता यांनी भाऊ अक्षय काळे याला बोलावून घेतले. त्यानंतर पत्नी प्रणिता आणि अक्षय या दोघांनी पती भाऊसाहेब शेळके यांना शिवीगाळ केली. तसेच “तू प्लॉट कसा विकतो, आम्ही पाहतो,” असे म्हणत त्यांना शेजारच्या रिकाम्या प्लॉटवर नेले. तिथे पत्नी, मेव्हणा आणि इतर दोघांनी लाकडी दांडक्याने त्यांच्या पायांवर, बरगडीवर मारहाण केली.
मारहाणीनंतर शेळके यांना गंभीर जखमी अवस्थेत गाडीत बसवले. तसेच हर्सुल जेलच्या मोकळ्या मैदानात सोडले. तू पुन्हा गल्लीत दिसल्यास जिवे मारू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
