फिर्यादी सय्यद इस्माईल सय्यद सलीम (वय 31, रा. जाधववाडी, आंबेडकरनगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या रिक्षातून एका महिला प्रवाशाला जयभवानीनगर येथून सिडको परिसरातील दिपाली हॉटेलजवळ सोडण्यासाठी आले होते. महिला रिक्षातून उतरताच तेथे उपस्थित असलेल्या सागर मुळे याने ‘माझ्या पत्नीला का घेऊन फिरतोस? तुझा तिच्याशी काय संबंध?’ असा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली.
advertisement
आई-बापाला दारू प्यायची सवय, नशेत लेकीसोबत किळसवाणे कृत्य, छ.संभाजीनगर हादरलं
वाद चिघळताच सागर मुळे याने रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा उचलून रिक्षाचालकाच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्याचवेळी अन्य एका व्यक्तीनेही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर जखमी रिक्षाचालकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास हवालदार धारबळे करत आहेत.






