advertisement

भाई-दादांच्या होर्डिंगची हौस कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली, जागेवरच गेला जीव, घटनेचा VIDEO

Last Updated:

मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर असलेले अनाधिकृत होर्डिंग्ज काढत असताना सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : अलीकडे पालिका निवडणुका पार पडल्या. पण, सर्वत्र शुभेच्छा आणि अभिनंदनाच्या होर्डिंगने शहर विद्रुप केलं आहे. अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू असताना एका पालिकेच्या कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. घटना घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्सनं रस्ते, चौक व्यापून टाकले आहे. मुकुंदवाडी परिसरात अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग हटवण्याचं काम सुरू होतं.  अनाधिकृत बॅनर्स काढताना मुकुंदवाडीत महापालिका कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला.  अमोल दिनकर जाधव (वय 27 रा. मुकुंदवाडी, संजयनगर ) असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर सोबत असलेला रवी रणधीर रिडलाॅन (वय 38) हा  कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी कर्मचाऱ्यालाा सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
advertisement
मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर असलेले अनाधिकृत होर्डिंग्ज काढत असताना सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. होर्डिंगला लोखंडी फ्रेम होती. होर्डिंग्ज काढल्यानंतर अमोल जाधव आणि रवी रिडलाॅन खाली घेऊन येत होते. पण अचानक होर्डिंगचा महावितरणच्या 33 केव्ही तारेला लागलं. तारेला स्पर्श झाल्यामुळे दोघांनाही विजेचा जबर धक्का बसला. अमोल जाधव हा जागेवरच कोसळला. तर रवी हा जखमी झालाा. स्थानिकांनी तातडीने रवी रिडलॉन याला रुग्णालयात हलवलं. अमोल जाधव या कर्मचाऱ्याचाा मृत्यू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
advertisement
महापौरांनी दिले कारवाई करण्याचे आदेश
दरम्यान,  अनधिकृत बॅनर संदर्भात मी सातत्याने बोलत आलो आहे. हे शहर अनधिकृत बॅनर मुक्त करायचं आहे. अनधिकृत बॅनर काढताना एकाचा मृत्यू होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेचे मला दुःख आहे सकाळपासून या घटनेमुळे मी व्याकुळ आहे. आपण अशी जीवघेणी स्पर्धा का करतो आहे, मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलंय. या बॅनर संदर्भात कोणतीही हयगय करत करता कामा नये, बॅनर संदर्भात एक धोरण निश्चित केलं पाहिजे, आताची जी घटना घडली त्या संदर्भात सर्व माहिती घेऊन प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी प्रतिक्रिया शहराचे महापौर समीर राजूरकर यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाई-दादांच्या होर्डिंगची हौस कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली, जागेवरच गेला जीव, घटनेचा VIDEO
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement