TRENDING:

पोटदुखीचा त्रास, ‎तपासणीत महिलेच्या अंडाशयात दिसलं असं काही, तातडीची शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी वाचवला जीव

Last Updated:

अंडाशयात मोठ्या आकाराची गाठ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती यशस्वीपणे काढून टाकली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या तपासणीत अंडाशयात मोठ्या आकाराची गाठ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती यशस्वीपणे काढून टाकली. चिकलठाणा परिसरातील 45 वर्षीय महिलेवर करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेस सिव्हिल सर्जन डॉ. मुदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे या प्रक्रियेत प्रथमच एपिड्युरल अॅनेस्थेशियाचा वापर करण्यात आला.
‎अंडाशयातील अडीच किलोची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात डॉक्टरांना यश<br>‎
‎अंडाशयातील अडीच किलोची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात डॉक्टरांना यश<br>‎
advertisement

सावित्री नगर, चिकलठाणा येथील मीरा संजय जाधव (वय 45) या काही दिवसांपासून पोटदुखी आणि पोटात गाठ जाणवत असल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या सोनोग्राफी आणि एमआरआय चाचण्या केल्या. या तपासणीत उजव्या अंडाशयात सुमारे 15 बाय 14 बाय 10 सेंटीमीटर आकाराची मोठी ओव्हेरियन सिस्ट असल्याचे निदान झाले. रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

advertisement

'गॅस कनेक्शन बंद होणार' तुम्हालाही असा कॉल आला तर सावधान, 14 लाखाची फसवणूक

एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी पद्धतीने ही गाठ यशस्वीपणे काढण्यात आली. सिव्हिल सर्जन डॉ. मुदखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कविता जाधव, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. वेडेकर आणि डॉ. शुभांगी यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

‎शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान अॅनेस्थेशिया विभागातील डॉ. वासुकर, डॉ. संजय चव्हाण, डॉ. विजय केंद्रे, डॉ. प्रवीण आणि त्यांच्या टीमने प्रथमच एपिड्युरल अॅनेस्थेशियाचा यशस्वी वापर केला. ऑपरेशन थिएटरचे व्यवस्थापन ओटी इंचार्ज अनिता जरवळ, रश्मी सिस्टर, घोडके सिस्टर तसेच गणेश यांनी पाहिले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पोटदुखीचा त्रास, ‎तपासणीत महिलेच्या अंडाशयात दिसलं असं काही, तातडीची शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी वाचवला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल