घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मोबाईल घेतल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत सुभाष कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुभाष कांबळे याचा मित्र अजहर अख्तर आली या मित्राने मोबाईल घेतल्याच्या संशयावरून सुभाषला मारहाण केली. या घटनेत सुभाष हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणात कन्नड पोलीस ठाण्यात आरोपी अजहर अख्तर अली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 17, 2024 9:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Crime News : मोबाईमुळे तरुणानं गमावला जीव; मित्रच झाला वैरी, छ. संभाजीनगर हादरलं
