नेमकं काय घडलं?
6 डिसेंबरच्या सायंकाळी तक्रारदाराच्या घरासमोर काही मुली शेकोटीजवळ बसल्या असताना काही युवक तिथून जाताना त्यांचे फोटो काढताना दिसले. हा प्रकार एका अल्पवयीन मुलाने पाहिला, पण संबंधित तरुण तेथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी रात्री हेच व्यक्ती पुन्हा दिसताच त्या मुलाने त्यांना फोटोबाबत विचारणा केली.
अल्पवयीन मुलाशी सुरू झालेला वाद काही वेळातच मोठ्या भांडणात बदलला. मुलासोबत बोलण्यासाठी त्याचे कुटुंबीय घटनास्थळी येताच 35-40 जणांचा गट जमा झाला. या जमावाने मुलगा आणि कुटुंबीयांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जीव घेण्याच्या धमक्या दिल्या. घरातील मुलींनाही अश्लील आणि बलात्काराच्या धमक्या देऊन दहशत निर्माण करण्यात आली.
advertisement
अल्पवयीन मुलाचे बोलणे आरोपींना न पटल्याने त्यांनी इतर साथीदारांना बोलावून घेतले आणि परिस्थिती आणखी बिघडवली. पुढील दिवशी काही राजकीय कार्यकर्त्यांनी हा विषय हाताळण्याचा प्रयत्न केल्याने वाद अधिक चिघळला. दोन्ही बाजूंनी सुरुवातीला तडजोड करण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु त्यानंतर पुन्हा तणाव वाढल्याने अखेर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणातील प्रमुख संशयितांची नावे पोलिसांनी निश्चित केली असून, अल्फाज कुरेशी, निजाम कुरेशी, अमन कुरेशी, मुजमील कुरेशी, शेहबाज कुरेशी यांच्यासह 35 ते 40 जणांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
