रक्षाबंधनला उघडलं कपाट..
छत्रपती संभाजीनगरमधील हडको परिसरात सेवानिवृत्त महिला मुलगी आणि मुलासह राहते. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने त्यांच्या मुलाने सोन्याची अंगठी मागितली. महिलेने कपाट उघडले असता डब्यात एकही दागिना आढळून आला नाही. शिवाय, 1 लाख 55 हजार रुपये रक्कम लंपास झाल्याचे आढळले. 14.1 तोळ्याहून अधिकचे दागिने आणि 1 लाख 55 हजारांची रक्कम लंपास झाल्याने महिलेला धक्का बसला. याबाबत मुलाला विचारलं असता, त्याला काहीच माहिती नव्हतं.
advertisement
मुलीनंच केलं कांड..
मुलानंतर आईने मुलीकडे चौकशी केली. मात्र उत्तर देताना मुलगी गडबडली. आईने तिला विश्वासात घेतल्यावर तिने तिचा मित्र मंगेश विलास पंडित याला दागिने व पैसे दिल्याचे कबूल केले. एका रात्री तिने बकेटमध्ये दागिने टाकून दोरीने ते खाली सोडले. मंगेशने ते मित्र कुणाल माणिक केरकर याच्या मदतीने घेतले. पुढे दागिन्यांचे काय झाले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
पैसे खाण्या-पिण्यावर उडवले..
मंगेश विलास पंडित आणि त्याचा मित्र कुणाल माणिक केरकर, दोघेही बेगमपुरा येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसी पाहुणचार मिळताच मंगेशने दागिने घेतल्याची कबुली दिली. मात्र, ते विकून पैसे खाण्या-पिण्यावर उडवल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.






