TRENDING:

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा शेकडो एकर जमिनीवर दावा, 103 शेतकऱ्यांना पाठवली नोटीस

Last Updated:

गेल्या अनेक पिढ्यांपासून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : वक्फ बोर्डाकडून लातूर जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दावा केला आहे की, वक्फ बोर्डाकडून त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या अनेक पिढ्यांपासून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणात दावा दाखल करण्यात आला आहे. १०३ शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या जवळपास ३०० एकर जमिनीसंदर्भात नोटीस बजावण्यात आलीय. एका शेतकऱ्यानं पीटीआयशी बोलताना याबाबत माहिती दिलीय. वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तांसदर्भात अशा पद्धतीची नोटीस आल्यानं आता शेतकऱ्यांनी सरकार दरबारी न्यायाची मागणी केलीय.

छत्रपती संभाजीनगरमधील तुकारम कानवटे यांनाही वक्फ बोर्डाची नोटीस आलीय. त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, आम्हाला पिढ्यान पिढ्या वारसा हक्काने या जमिनी मिळाल्या आहेत. ही काही वक्फ बोर्डाची मालमत्ता नाहीय. आता राज्य सरकारनेच आम्हाला न्याय द्यावा. या प्रकरणी न्यायालयात दोन सुनावण्या झाल्या असून २० डिसेंबरला पुढची सुनावणी आहे.

advertisement

वक्फ बोर्डाच्या कामकाजासंदर्भात आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन व्हावे यासाठी केंद्र सरकारने नुकतंच एक विधेयक आणलं होतं. वक्फ दुरुस्ती विधेयक ८ ऑगस्टला लोकसभेत सादर केलं गेलं. यानंतर मंजुरीसाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलंय.

वक्फ म्हणजे काय?

वक्फ म्हणजे इस्लामिक कायद्यांतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी समर्पित मालमत्ता. वक्फ हा अरबी शब्द वकुफापासून आला आहे, ज्याचा अर्थ कायमस्वरूपी निवासस्थान आहे. वक्फ म्हणजे ट्रस्टची मालमत्ता सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित करणे. इस्लाममध्ये ही एक प्रकारची सेवाभावी व्यवस्था आहे. वक्फ म्हणजे इस्लामच्या अनुयायांनी दान केलेली मालमत्ता. हे जंगम आणि अचल दोन्ही असू शकते. ही संपत्ती वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा शेकडो एकर जमिनीवर दावा, 103 शेतकऱ्यांना पाठवली नोटीस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल