म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारित काही भूखंड येतात. यावरील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिका आणि भूखंडांसाठी ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत एक हजार 148 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 154 सदनिक आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 21 सदनिका व 18 भूखंडांचा समावेश आहे.
advertisement
Society Maintenance: सोसायटीत द्यावा लागेल जास्तीचा मेंटेनन्स, हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब
दरम्यान, संगणकीय सोडतीसाठी एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली व ॲपवर सदनिकांच्या अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला होता.