काय म्हणाले बच्चू कडू?
राज्य सरकारच्या योजनेत दिव्यांगांना इ रिक्षावाटप करण्यात आले होते. मात्र, त्या इ रिक्षा खराब होत्या अशी तक्रार दिव्यांग लोकांनी बच्चू कडू यांच्याकडे संभाजी नगरात केली. त्यामुळे बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होते. मात्र, कंपनीने माहिती नसलेला एक कर्मचारी पाठवला. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच त्याच्यावर संतापले आणि त्याच्या कानाशिलात लगावली. जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
advertisement
वाचा - बीडमध्ये मनसेला धक्का! राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
या वेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी झापलं. जवळपास 500 रिक्षांचे वाटप करण्यात आलंय, पैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचे म्हणणं आहे. कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असे कडू म्हणाले. या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात असे कडू यांनी सांगितले. दरम्याम राज्य सरकार याबाबत चौकशी करेल असे दिव्यांग विभागाचे अधिकारी सांगताय.
नेमकं काय घडलं?
बच्चू कडू यांचा शुक्रवारी संभाजीनगरमध्ये महामोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी अजूनही या मोर्चाला परवानगी दिली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आम्ही प्रहार स्टाईलने मोर्चा काढू असा इशारा त्यांनी संभाजीनगर पोलिसांना दिला आहे. त्यांनी आम्हाला थांबवू नये अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. सरकार आमची अडवणूक करेल असे वाटत नाही. त्यांनी असे केले तर त्यांना महागात पडेल असही बच्चू कडू म्हणाले.
पत्रकार परिषद संपल्यानंतर बच्चू कडू हे शासकीय निवासाच्या बाहेर काही दिव्यांग व्यक्तींना भेटले. दिव्यांग व्यक्तींनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या, समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग गरीब व्यक्तींना उदरनिर्वाह करण्यासाठी इ रिक्षा वाटण्यात आल्या होत्या, मात्र, त्या रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्या. काही रिक्षांना टो करून घरापर्यंत न्यावं लागलं, तर काही रिक्षा चढावर चढतच नाही. दिव्यांगाची ही सर्व तक्रार ऐकताच बच्चू कडू कमालीचे आक्रमक झाले. त्यांचा पारा चढला त्यानंतर त्यांनी शेजारीच उभे असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली.