ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे ५:३० वाजता पुंडलिकनगर येथील गजानन महाराज मंदिर रस्त्यावर उघडकीस आली. एका २४ वर्षीय तरुणीने कुटुंबापासून आपली गर्भधारणा लपवण्यासाठी घरातच बाळाला जन्म दिला आणि त्याची नाळ कापली. त्यानंतर बाळाला एका गोणीत गुंडाळून कचऱ्यात फेकून दिले.
पहाटेच्या थंडीत हे बाळ गारठलं. भटक्या कुत्र्यांनी गोणीला दोन वेळा लचके तोडले. तसेच, ही गोणी एकदा बसखालीही आली. तरीही बाळ सुरक्षित राहिले. काही सतर्क नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांनी बाळाच्या आईचा शोध घेत, तिला ताब्यात घेतलं. तिची चौकशी केली असता, तिनेच आपल्या बाळाला अशाप्रकारे कचऱ्यात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. बाळ सध्या रुग्णालयात असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
