मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 15 वर्षांपासून मराठा समाजासाठी आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने आमरण उपोषण केले. त्यांनी आंतरवाली सराटी येथे दोन वर्षांपासून आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो मराठा बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. 27 ऑगस्ट 2025 रोजी आंतरवाली सराटी येथून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे निघाले. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2025 या काळात सीएसएमटी, आझाद मैदान आणि मनपा चौकात त्यांनी ठिय्या आंदोलन केले. दररोज लाखो मराठा बांधव सीएसएमटी बाहेरील चौकात उपस्थित राहत होते. 3 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करून इतर सहा मागण्या मान्य केल्या. या लढ्यामुळे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात चर्चेत आले.
advertisement
Manoj Jarange : '...म्हणून त्यांची पोटदुखी', जीआरवर शंका घेणाऱ्या मराठा नेत्यांवर जरांगेंचा पलटवार
सीएसएमटी हा ऐतिहासिक आणि गर्दीचा परिसर आहे. लाखो लोक दररोज या भागातून प्रवास करतात. त्यामुळे या चौकाला मनोज जरांगे पाटील यांचे नाव दिल्यास मराठा, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि बहुजन समाजातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे समितीचे म्हणणे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने चौकाचे नामकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राहुल पाटील ढोले, महेशभाई गुजर, अण्णासाहेब जाधव, योगेश पाटेकर, सार्थक पाटेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.