TRENDING:

Vande Bharat: वेग वाढला, आता वेळ वाचणार, लगेच पाहा नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं बदललेलं वेळापत्रक

Last Updated:

Vande Bharat Express: मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून वंदे भारत एक्स्प्रेसने मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईचा प्रवास करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: हजूर साहिब नांदेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता सुसाट सुटणार आहे. नुकतेच या गाडीचा वेग वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेडहून प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होईल, तर छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या प्रवाशांची 20 मिनिटे वाचतील. ही ट्रेन आता ताशी 130 किमी वेगाने धावणार असून सुधारित वेळापत्रक 3 मे पासून लागू होईल.
वेग वाढला, आता वेळ वाचणार, नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्त्वाचं अपडेट, लगेच पाहा बदललेलं वेळापत्रक
वेग वाढला, आता वेळ वाचणार, नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्त्वाचं अपडेट, लगेच पाहा बदललेलं वेळापत्रक
advertisement

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून वंदे भारत एक्स्प्रेसने (20705/20706) मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईचा प्रवास करतात. सुधारित वेळेमुळे नांदेडहून येणाऱ्या प्रवाशांची 30 मिनिटे वाचतील, तर छत्रपती संभाजीनगरहून निघणारे प्रवासी 20 मिनिटे आधी पोहोचतील. त्यासाठी मनमाड येथे धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस आणि हिंगोली आणि जालना स्थानकांदरम्यान धावणाऱ्या हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात देखील काही मिनिटांचे किरकोळ बदल केले जातील.

advertisement

मुंबई-छ. संभाजीनगर विमान सेवेबाबत मोठं अपडेट, वेळापत्रक अन् लोकेशन बदललं, आता कुठून झेपावणार?

सन 2023 मध्ये देशभरातील 53 रेल्वे मार्गांवर 130 किमी प्रतितास वेगाने गाड्या चालवण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये जालना-मनमाड मार्गाचा देखील समावेश होता. वेग वाढवण्यासाठी, विद्युतीकरणावर तसेच ट्रॅक आणि पॉइंट्सचे मजबुतीकरण करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे नांदेड-मुंबई वंदे भारत देखील ताशी 130 किमीच्या वेगाने धावणार आहे. सध्या ही गाडी ताशी 100 किमी वेगाने धावते.

advertisement

मुंबईसाठी नवीन ट्रेन कधी?

ऑगस्ट 2025 मध्ये वंदे भारत एक्स्प्रेस जालना ते नांदेडपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरहून नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत होती. याबाबत नवीन ट्रेन सेवा सुरू करण्याची घोषणा देखील झाली. परंतु, त्याची अंमलबजावणी अजूनही प्रलंबित आहे.

कसं असेल नवं वेळापत्रक?

रेल्वे स्टेशन - सध्याचे वेळापत्रक - 3 मे पासूनचे वेळापत्रक (आगमन/प्रस्थान वेळ)

advertisement

हजूर साहिब नांदेड: सकाळी 5:00 → सकाळी 5:20

परभणी: सकाळी 5:40/5:42 → सकाळी 5:58/6:00

जालना: सकाळी 7:20/7:22 → सकाळी 7:33/7:35

छत्रपती संभाजीनगर: सकाळी 8:13/8:15 → सकाळी 8:23/8:25

मनमाड: 09:58 / 10:10 (बदल नाही)

नाशिक रोड: 10:58 / 11:00 (बदल नाही)

कल्याण: 13:08 / 13:10 (बदल नाही)

ठाणे: 13:28 / 13:30 (बदल नाही)

advertisement

दादर: 13:48 / 13:50 (बदल नाही)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई: दुपारी 2:25 → दुपारी 2:15

परतीच्या प्रवासातही वेळेची बचत

परतीच्या प्रवासात, मुंबईहून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 1:10 ऐवजी दुपारी 1:15 वाजता निघेल. सध्या, ती छत्रपती संभाजीनगर येथे संध्याकाळी 6:53 वाजता पोहोचते आणि संध्याकाळी 6:55 वाजता निघते. सुधारित वेळापत्रकानुसार, ती संध्याकाळी 6:43 वाजता पोहोचेल आणि संध्याकाळी 6:45 वाजता निघेल, ज्यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त प्रवास वेळ वाचेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

दरम्यान, नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावते. नांदेडहून बुधवारी तर मुंबईतून गुरुवारी बंद असते. आता वेग वाढल्याने मराठवाड्यातील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Vande Bharat: वेग वाढला, आता वेळ वाचणार, लगेच पाहा नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं बदललेलं वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल