नाशिक जिल्ह्यातील 24 वर्षीय अंकुश छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज औद्योगिक वसाहतीत काम करत होता. तिथे त्याची एका कामगाराच्या मुलीसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी संसाराच्या आणाभाका घेत पळून जात लग्न केले. तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याने अंकुशवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
Mother Love: सतत ताप अन् मळमळ, लेकीला गंभीर आजार, शेवटी आईच ती, घेतला जीवावर बेतणारा निर्णय!
advertisement
पोलिसांनी शोध घेतला...
पोलिसांनी दोघांचा सगळीकडे शोध घेतला. परंतु, मोबाईल क्रमांक बदलून ते नाशिक-ठाणे-मुंबई मार्गे धाराशिवला जात एका जमीनदाराकडे सालगडी म्हणून काम करू लागले. इकडे मुलगी कशी आणि कुठे असेल या काळजीने आई-वडिलांची चिंता वाढली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केला. विभागाच्या प्रमुख सहाय्यक निरीक्षक जयश्री कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने शोध सुरू केला.
बहिणीला फोन केला अन् फसला
अंकुश याने फोनवरून बहिणीशी संवाद साधला. तेव्हा तांत्रिक तपासात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. धाराशिवमधील शेतातील घरापर्यंत पोलीस पोहोचताच दोघांना धक्का बसला. पत्नी अल्पवयीन असताना फूस लावून पळवून नेल्याच्या गुन्ह्यात अंकुशला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुलीला 18 वर्षे
लग्नाच्या वेळी अल्पवयीन असणाऱ्या मुलीला 10 ऑक्टोबर रोजी 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता पोलिसांनी पती अंकुशला अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे. परंतु, पतीच्या जामिनासाठी लढून त्यांना बाहेर काढेन आणि त्यांच्याशीच संसार करेल, असे मुलीने बोलून दाखवले.
घरात 5 महिन्यांची चिमुकली
अंकुश आणि त्याची अल्पवयीन पत्नी धाराशिवमधील एका शेतात सागडी म्हणून काम करत होते आणि तिथेच राहत होते. तेव्हा त्यांनी एका बाळाला जन्म दिला. पत्नीने नुकतेच 18 वर्षे पूर्ण केली असली तरी त्यांना 5 वर्षांची चिमुकली आहे. आता वडिलांना अटक झाली असून ही चिमुकली आईसह घरी आहे.






