7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. लोकसभेत भाजपने शिवसेनेचं काम केलं आणि संदीपन भुमरे निवडून आले. त्यानंतर संजय सिरसाट यांनी साधे आभार सुद्धा मानले नाहीत. मग आम्ही काय फक्त शिवसेनेचे काम करायचे? असा सवाल राजू शिंदे यांनी केला आहे. राजू शिंदे पश्चिम मतदार संघातून संजय सिरसाट यांच्या विरोधात उभे होते, त्यांना 40 हजार मते पडली होती. आता पुन्हा विधानसभा तिकीट मिळेल की नाही अशी शंका असल्याने राजू शिंदे आपला गट घेऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून, महाविकास आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. आता सर्वचं राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.