कुठं तरी आपण थांबलं पाहिजे - प्रकाश महाजन
कुठं तरी आपण थांबलं पाहिजे, असं मला वाटत होतं. मी गंगेला बोलवलं त्यावेळेसच थांबायला हवं होतं. मी पहलगामच्या वेळेसच थांबायला हवं होतं. पण त्यावेळेस मला वाटलं की काहीतरी सुधारणा होईल. माझी अपेक्षा फार थोडकी आहे. मला तिकीट वेगैरे काही नको होतं. माझ्या फार अपेक्षा नसताना माझ्या वाटेला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही. विधानसभेला प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जबाबदारी मला दिली. ती मी पार पाडली.
advertisement
मी अमितजी यांचा अपराधी - प्रकाश महाजन
जे पाप माझ्याकडून घडलंच नाही, त्याचे आरोप माझ्यावर लावण्यात आले. मी फक्त अमित ठाकरे़जी यांचा अपराधी आहे. संभाजीगनरच्या सभेत मी त्यांना शब्द दिला होता. मी तुमच्यासोबत काय तर तुमच्या मुलासोबत काम करेन. अमितजी मला समजून घेतील, असं मी समजतो. कधी कधी मनसारखं मिळत नाही, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे
दरम्यान, मी मनसे सैनिकांचा ऋषी राहिल, पण मला असं वाटतं की, आपण आता थांबलं पाहिजे. कुठंतरी मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.
दरम्यान, प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू, माजी खासदार पूनम महाजन यांचे काका, तर मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा आहेत. त्यामुळे आता प्रकाश महाजन भाजपची वाट धरणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.