TRENDING:

एक चूक अन् खेळ खल्लास, 20 सेकंदाच्या कॉलने प्रा. लोंढेंच्या खुनाचा उलगडा, मारेकरी विशाल राठोड कसा अडकला जाळ्यात?

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता या प्रकरणातला मोठा खुलासा समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपी विशाल राठोडने रचलेला अत्यंत गुंतागुंतीच्या हत्याकांडाची उकल केली आहे. त्याच्या एका छोट्या चुकीमुळे पोलिसांनी त्याचा संपूर्ण कट उघडकीस आणला आहे. प्राध्यापक लोंढे बेपत्ता झाल्यानंतर त्यांना एक २० सेकंदाचा कॉल आला होता. हा कॉल दुसरा तिसरा कुणाचा नव्हे तर विशालचा होता. यावरूनच पोलिसांनी हत्याकांड उघडकीस आणलं आहे.
professor rajabhau londhe murder case
professor rajabhau londhe murder case
advertisement

एक चूक अन् विशालचा खेळ खल्लास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक लोंढे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी विशाल राठोडला चौकशीसाठी बोलावलं होतं. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विशालने एक भयानक योजना आखली होती. चौकशीतून सुटल्यावर त्याने थेट सिग्मा हॉस्पिटल परिसर गाठला, जिथे त्याने लोंढेंचा मोबाईल जमिनीत पुरला होता. मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे तो बंद पडला होता. विशालने तो बाहेर काढून पॉवर बँकच्या सहाय्याने चार्ज केला आणि पुन्हा सुरू केला.

advertisement

त्यानंतर त्याने स्वतःच्या फोनवरून लोंढेंच्या मोबाईलवर २० सेकंदांचा कॉल केला. तपासादरम्यान पोलिसांना विशाल आणि मृत प्रा. लोंढे यांच्या मोबाईलचे लोकेशन एकाच वेळी, एकाच ठिकाणी दिसून आले. एका बाजूला लोंढे बेपत्ता असताना त्यांचे लोकेशन आणि संशयित विशालचे लोकेशन मॅच झाल्याने पोलिसांची खात्री पटली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली.

पुण्यातील 'स्टेटस' अपडेटचे रहस्य

advertisement

विशालचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. याचा फायदा घेत त्याने तपासाची दिशा भरकटवण्यासाठी लोंढेंचा मोबाईल पुण्याला पाठवला होता. तेथून लोंढेंच्या व्हॉट्सॲपवरून इंग्रजी भाषेत स्टेटस अपडेट करण्यात आले, जेणेकरून लोंढे पुण्यात सुरक्षित आहेत असा आभास निर्माण व्हावा. मात्र, हा फोन पुण्याला कोणी नेला आणि नेमका स्टेटस कोणी ठेवला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

advertisement

रील्सस्टार महिलेचं कनेक्शन आणि २५ लाखांचा व्यवहार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या प्रकरणात आता आर्थिक व्यवहाराचं देखील कनेक्शन समोर आलं आहे. एका प्रसिद्ध मराठी रील्सस्टार महिलेची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. तपासात असे समोर आले आहे की, प्रा. लोंढे यांनी या महिलेला तब्बल २५ लाख रुपये दिले होते. याच पैशांच्या वादातून त्यांची हत्या झाली असावी, असा संशय आहे. तसेच या महिलेकडून लोंढे यांना हनिट्रॅपमध्ये अडकवल्याची आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याची देखील माहिती समोर येत आहे. आतापर्यंत प्राध्यापक लोंढे हत्याप्रकरणात अनेक कंगोरे समोर आले आहेत. पोलीस सर्व बाजुने तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
एक चूक अन् खेळ खल्लास, 20 सेकंदाच्या कॉलने प्रा. लोंढेंच्या खुनाचा उलगडा, मारेकरी विशाल राठोड कसा अडकला जाळ्यात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल