या वेळी सुमन निकम यांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या तीन व्यक्तींनी हिसकावून पळ काढला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 18 सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या बारकाईने केलेल्या तपासणीदरम्यान, एका युवकाची इतर सामान्य लोकांपेक्षा वेगळी हेअरस्टाइल पोलिसांच्या नजरेत भरली.
18 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. पण फुटेज नीट पाहिल्यावर आरोपी कोण असू शकतो, याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी हेअरस्टाइलवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
advertisement
पोलिसांनी या विशिष्ट हेअरस्टाइलवरून तपास अधिक केंद्रित केला आणि ती हेअरस्टाइल शुभम राठोड याची असल्याचे त्यांना ओळखता आले. तत्काळ पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कठोर चौकशीनंतर, शुभमने अखेर या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारासह त्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीला गेलेले सोन्याचे 12 मणी, कानातील कुड्या आणि एक मोबाइल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
