नेमकं काय म्हणाले शरद पवार?
'पक्षात येण्याची काही जणांची इच्छा आहे, मात्र पक्षात घ्यायचं की नाही हे नेते बसवून ठरवतील. सरसकट प्रवेश नको अशी भूमिका असल्याचं' पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना धक्के दिले आहेत. आज देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असून? आणखी किती नेते अजित पवार यांची साथ सोडणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
advertisement
दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मतभेद असण्याचं काही कारण नाही. दोन समाजात दरी निर्माण व्हायला नको. दोन -तीन जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जी चर्चा करायला हवी होती ती सरकारनं केली नाही. जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेसाठी बोलवावं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.