TRENDING:

परीक्षा देऊन घरी येत होता, वाटेतच स्वप्नांचा चुराडा, संभाजीनगरात विद्यार्थ्याला डंपरने चिरडलं

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील बारापुल्ला परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका विद्यार्थ्याचा करुन अंत झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: शहरातील बारापुल्ला परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका विद्यार्थ्याचा करुन अंत झाला आहे. परीक्षा देऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका विद्यार्थ्याला महापालिकेच्या कचरा वाहणाऱ्या डंपरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, निष्पाप विद्यार्थ्याच्या बळीने संताप व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याचे नाव ओंकार रायभान खनसे असं आहे. ओंकार बुधवारी दुपारी प्रॅक्टिकलची परीक्षा देऊन बाहेर पडला होता. परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी त्याने काही वेळ आपल्या मित्रांसोबत घालवला. त्यानंतर तो आपल्या दुचाकीने मिल कॉर्नरमार्गे छावणीच्या दिशेने आपल्या घराकडे निघाला होता.

परंतु, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बारापुल्ला गेट परिसरातून जात असताना, महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या कंपनीचा एक भरधाव डंपर समोरून आला. या डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने ओंकारच्या मोपेडला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओंकार रस्त्यावर फेकला गेला आणि डंपरच्या चाकाखाली आला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
परीक्षा देऊन घरी येत होता, वाटेतच स्वप्नांचा चुराडा, संभाजीनगरात विद्यार्थ्याला डंपरने चिरडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल