TRENDING:

चालताना समोरचा अडथळा येईल लक्षात! ZP च्या विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींसाठी बनवली सेन्सर कॅप

Last Updated:

कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता या विद्यार्थ्यांनी स्वतः रोबोट आणि अंध व्यक्तींसाठी सेन्सर कॅप तयार केली असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाडीवाट येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळी कामगिरी केली आहे. कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता या विद्यार्थ्यांनी स्वतः रोबोट आणि अंध व्यक्तींसाठी सेन्सर कॅप तयार केली असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement

शाळेमध्ये अत्याधुनिक साधने किंवा मोठी लॅब नसतानाही विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयोग करत हा रोबोट बनवला. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि इंटरनेटवरील माहितीच्या आधारे त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. या रोबोटला विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.

Success Story : तरुण शेतकऱ्याने केला कलिंगडाचा यशस्वी प्रयोग, 65 दिवसांत 5 लाख कमाई

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींसाठी सेन्सर कॅप तयार केली आहे. या कॅपमध्ये सेन्सर बसविण्यात आले असून समोर अडथळा आल्यास इशारा मिळतो. त्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना चालताना मदत होऊ शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून सामाजिक भान जपत असा प्रकल्प साकारला जाणे ही अभिमानाची बाब आहे. यासाठी त्यांना 500 रुपये खर्च आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
समोरचा अडथळा येईल लक्षात! विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींसाठी बनवली सेन्सर कॅप
सर्व पहा

या प्रकल्पात सहभागी असलेल्या विद्यार्थ्याने सांगितले की, मला भविष्यात रोबोटिक्स क्षेत्रात करिअर करायचे आहे. चांगली नोकरी करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करायचे आहे. गाव लहान असले तरी येथील विद्यार्थ्यांची स्वप्ने मोठी आहेत. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी कामगिरी करू शकतात, हे गाडीवाटच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चालताना समोरचा अडथळा येईल लक्षात! ZP च्या विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींसाठी बनवली सेन्सर कॅप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल