TRENDING:

6 महिने मेहनत, पण वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, मोसंबीच्या बागेत भयंकर अवस्थेत आढळला सुशांत

Last Updated:

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी पैठण–पाचोड रस्त्यालगत रहाटगाव शिवारातील मोसंबी बागेजवळ सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : खांद्यावर वर्दी चढवण्याचे स्वप्न, डोळ्यांत समाजसेवेची ओढ आणि त्यासाठी सुरू असलेली अथक धडपड… पण नियतीने एका जिद्दी तरुणाची ही स्वप्ने अर्ध्यावरच तोडली. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी पैठण–पाचोड रस्त्यालगत रहाटगाव शिवारातील मोसंबी बागेजवळ सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस बनण्याचे स्वप्न अपूर्णच; अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी
पोलिस बनण्याचे स्वप्न अपूर्णच; अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी
advertisement

‎सुशांत संतोष भोजने (रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो पोलिस भरतीसाठी कठोर सराव करत होता. दररोज पहाटे तो पैठण–पाचोड मार्गावर धावण्याचा सराव करीत असे. सोमवारी पहाटेही तो नेहमीप्रमाणे घरातून सरावासाठी बाहेर पडला; मात्र तो परतलाच नाही.

‎Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त छ. संभाजीनगरमध्ये वाहतुकीत बदल, कोणते रस्ते राहणार बंद? पर्यायी मार्ग कोणते?

advertisement

कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक, मित्रमंडळींशी संपर्क साधला तरीही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर पाचोड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर शोधमोहीम सुरू असतानाच मंगळवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास रहाटगाव शिवारातील एका मोसंबी बागेजवळ, रस्त्याच्या कडेला झुडपांत सुशांतचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच वरुडीचे सरपंच अक्रूर गलधर, नानेगावचे सरपंच अनिल बोधने तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा होता.

advertisement

‎पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक अजीज शेख, उपनिरीक्षक सारंग आणि जमादार नरेंद्र अंधारे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक तपासानुसार, धावण्याचा सराव करत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

advertisement

शवविच्छेदनानंतर मंगळवारी सायंकाळी वरुडी येथे सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक जिद्दी खेळाडू आणि भावी पोलिस अधिकारी गमावल्याने दावरवाडी आणि वरुडी परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेची पैठण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
6 महिने मेहनत, पण वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, मोसंबीच्या बागेत भयंकर अवस्थेत आढळला सुशांत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल