काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"मी मुद्दाम आलोय, लोकसभा दुर्दैवाने जिंकले, पण संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही. 400 पार करणार होते, पण जाऊ दिले नाही. संभाजीनगरचे बीज बाळासाहेब ठाकरे यांनी रोवले आहे. आपण आत्मविश्वासाने लढलो का? चंद्रकांत खैरे सारखा मानून हरला जिंकला तरी सोबत राहिला. हारजीत होत राहते निष्ठा महत्त्वाची आहे", असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारला लक्ष्य केलं. तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे. आता झालेली निवडणूक देशाची होती, आताची महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. संतांची भूमी आहे, लाचारी होऊ देणार नाही, महाराष्ट्राची मान खाली जाऊ देणार नाही. योजनांची अतिवृष्टी होत आहे. मात्र उपाययोजना नाही नसल्याची टीका ठाकरेंनी केली.
advertisement
वाचा - 'भुजबळांना परत यायचं असेल तर...', पवारांच्या भेटीनंतर NCP नेत्याचं मोठं विधान
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार : ठाकरे
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. सरकारने या घोषणा जाहीर केल्या. या फक्त निवडणुकीसाठी आहे. मात्र, यावेळेस त्यांचं सरकार येणार नाही. शेतकऱ्यांची वीजमाफीची घोषणा सरकारने केली आहे . मात्र, वीजबील थकबाकीवर सरकारने चकार शब्द काढला नाही. थकबाकी देखील माफ करा, अशी आमची मागणी आहे. वीज कनेक्शन कापले जातंय आणि वीजबील भरा म्हणून सांगितले जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन अजून एक आठवडा सुरू राहणार आहे. त्यामुळे वीजबील थकबाकी माफी याच अधिवेशनात करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
