Chhagan Bhujbal : 'भुजबळांना परत यायचं असेल तर...', शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
- Published by:Shreyas
Last Updated:
विधानसभा निवडणुकीआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून 100 पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती : विधानसभा निवडणुकीआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून 100 पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाशिक शहरातील राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नाना महाले यांनी 100 पदाधिकाऱ्यांसह बारामतीमध्ये येऊन शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशावेळी छगन भुजबळ यांच्या घरवापसीबद्दल मोठं वक्तव्य केलं गेलं आहे. छगन भुजबळ यांची महायुतीमध्ये घुसमट होत आहे. भुजबळांना आघाडीमध्ये परत यायचं असेल तरी सुद्धा शरद पवार त्यांना घेणार नाहीत. भुजबळ यांच्या परतीचे दोर आता कापले गेले आहेत, असं वक्तव्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी केलं आहे.
advertisement
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिकमधून 10 ते 12 जागा शरद पवारांकडे मागितल्या आहेत, तिथे आम्ही नक्की निवडून येऊ, असा विश्वास पक्ष प्रवेशानंतर नाना महाले यांनी व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ नाराज?
view commentsमागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकमधून लढण्यासाठी आपल्याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सांगण्यात आल्याचं भुजबळ म्हणत होते, पण ही जागा शेवटी शिवसेनेला देण्यात आली. तसंच भुजबळांना राज्यसभेवर पाठवलं जाईल, अशीही चर्चा होती. पण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं. राज्यसभा न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज झाल्याचंही बोललं गेलं होतं. तसंच राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही भुजबळांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय लवकर घ्या असं वक्तव्यही केलं होतं. तसंच जागावाटपामध्ये राष्ट्रवादीला 80-85 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिकाही भुजबळांनी मांडली होती.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
July 07, 2024 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhagan Bhujbal : 'भुजबळांना परत यायचं असेल तर...', शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान


