TRENDING:

संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भयंकर कांड, पती घरात झोपला होता, पत्नीने तोंडावर ठेवली उशी, प्रियकराने गळा आवळला

Last Updated:

Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी महिलेनं पती घरात झोपलेला असताना प्रियकराला गुपचूप घरात बोलवलं. यानंतर दोघांनी तोंडावर उशी ठेवून आणि ओढणीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न त्यांचा फसला, यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

शीला सुरेश खालापुरे (३६, रा. कोमलनगर, पडेगाव) आणि प्रियकर राजू भानुदास खैरे (रा. पैठण) अशी या आरोपींची नावे आहेत. सुरेश श्रीमंत खालापुरे असं ४२ वर्षीय फिर्यादीचं नाव आहे. सुरेश हे शीला आणि राजूच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत होते. याच कारणातून दोघांनी हा हत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. पण शीला आपल्या ९ वर्षांच्या मुलासह घटनास्थळावरून पसार झाल्या आहेत.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पडेगावच्या कोमलनगर भागात ही घटना घडली. पती झोपेत असताना पत्नीने पतीच्या तोंडावर आधी उशी ठेवली, नंतर प्रियकराने त्याचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या आरडाओरडमुळे शेजारील लोक घटनास्थळी दाखल झाले. घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रियकराला चोप दिला. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

फिर्यादी सुरेश खालापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रिक्षाचालक असून त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. सुरेश यांची आरोपी पत्नी ही वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वी तिने काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले. दरम्यान, २ ऑगस्टला खालापुरे ११ वाजेच्या सुमारास पलंगावर झोपलेले असताना अचानक त्यांच्या तोंडावर उशी ठेवून तोंड दाबण्याचा प्रयत्न केला आणि राजू खैरे याने ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला.

advertisement

आवाज घराबाहेर जाऊ नये म्हणून शीलाने वाढवला टीव्हीचा आवाज

खालापुरे यांनी जेवण केल्यानंतर पत्नी आरोपी शीला हिने घराचा दरवाजा उघडा ठेवून प्रियकर राजूला घरात बोलावले. घरात राजू आल्यानंतर शीलाने दरवाजा ढकलून घेतला. त्यानंतर घरातील आवाज बाहेर जाऊ नये आणि संशय येऊ नये म्हणून तिने टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला. पण ज्यावेळी हा हत्येचा प्रयत्न झाला, तेव्हा सुरेश यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. खालापुरे यांचा आवाज ऐकून त्यांचे घरमालक तातडीने घरात दाखल झाले आणि सुरेश यांचा जीव वाचवला.

advertisement

पलंग आणि भिंतीच्या 'मध्ये' पडल्यामुळे वाचला जीव

खालापुरे यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या झटापटीमुळे ते पलंग आणि भिंतीच्या मध्ये असलेल्या निमुळत्या भागात पडले. यामुळे आरोपींना त्यांचा गळा आवळता आला नाही. आरडाओरड केल्यामुळे वरच्या मजल्यावर राहणारे घरमालक विशाल जाधव तत्काळ खालापुरे यांच्या मदतीला धावले. या प्रकारामुळे गल्लीतील नागरिक जमा होत आरोपी राजूला पकडत नागरिकांनी चोप दिला. दरम्यान, संधी साधत शीला ९ वर्षांच्या मुलाला घेऊन घटनास्थळावरून पसार झाली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भयंकर कांड, पती घरात झोपला होता, पत्नीने तोंडावर ठेवली उशी, प्रियकराने गळा आवळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल