अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण ८७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडला जातो. सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ४४ जागा आवश्यक असतात. २०१७ साली भारतीय जनता पक्ष ४५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आताही भाजप बहुमत पार करू शकतो, असा अंदाज आहे.
विवेक कलोती फडणवीसांचे मामेभाऊ पराभूत
अमरावती महानगरपालिकेच्या मतमोजणीत बिग फाईटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले. या निकालामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल दिसून येत असून सत्ताधारी आघाडीला हा निकाल धक्का मानला जात आहे.
advertisement
फडणवीसांच्या आशीर्वादाने विवेक कलोती यांना थेट स्थायी समिती सभापतीपद मिळाले होते
अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विवेक कलोती यांची २०१८ ला बिनविरोध निवड झाली होती. कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ असल्याने त्यांच्याच आशीर्वादाने कलोती यांना थेट स्थायी समितीचं सभापतीपद मिळाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र त्यानंतर यंदा झालेल्या निवडणुकीत त्यांना महापालिका निवडणूक जिंकण्यात अपयश आले.
