TRENDING:

Devendra Fadnavis: स्टील प्लांटची पायाभरणी ते विकासकामांचे उद्घाटन, CM फडणवीसांकडून गडचिरोलीत ऐतिहासिक प्रकल्पांचा शुभारंभ

Last Updated:

CM Devedra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 4.5 एमटीपीए स्टील प्लांटचा पायाभरणी समारंभ पार पडणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई/गडचिरोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या वाढदिवशी गडचिरोली दौऱ्यावर असून, विकासाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जसे मुख्यमंत्री गडचिरोलीत होते, तसाच हा वाढदिवसही त्यांनी गडचिरोलीच्या विकासासाठीच समर्पित केला आहे.
स्टील प्लांटची पायाभरणी ते विकासकामांचे उद्घाटन, CM फडणवीसांकडून गडचिरोलीत ऐतिहासिक प्रकल्पांचा शुभारंभ
स्टील प्लांटची पायाभरणी ते विकासकामांचे उद्घाटन, CM फडणवीसांकडून गडचिरोलीत ऐतिहासिक प्रकल्पांचा शुभारंभ
advertisement

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 4.5 एमटीपीए स्टील प्लांटचा पायाभरणी समारंभ पार पडणार आहे. हा प्रकल्प विदर्भातील पहिलाच स्टील प्रकल्प असून, यामध्ये 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे 10,000 थेट व अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असून, गडचिरोलीच्या औद्योगिक भविष्याला दिशा मिळणार आहे.

याशिवाय मुख्यमंत्री हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईनचे उद्घाटन करणार आहेत. हा प्रकल्प खनिज वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो स्थानिक विकासालाही चालना देईल.

advertisement

हेडरी येथील आयर्न ओर आणि ग्राईंडिंग युनिट – जे महाराष्ट्रातील पहिले युनिट आहे – याचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. या युनिटमुळे खनिज प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याची क्षमता आहे.

कोनसरी येथे पॅलेट प्लांटचे उद्घाटन हे आजच्या दौऱ्यातील आणखी एक महत्त्वाचे टप्पे आहे. महाराष्ट्रातील पहिला व एकाच रचनेतील भारतातील सर्वांत मोठा पॅलेट प्रकल्प म्हणून हा प्रकल्प औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

advertisement

औद्योगिक प्रकल्पांबरोबरच सामाजिक पायाभूत सुविधा क्षेत्रातही मुख्यमंत्री पुढाकार घेत आहेत. कोनसरी येथे 100 खाटांचे रुग्णालय आणि आधुनिक सीबीएसई शाळेचे भूमिपूजन, तसेच सोनमपल्ली येथे लॉईडस टाऊनशीपचे भूमिपूजन होणार आहे.

दुपारी मुख्यमंत्री ‘हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र’ वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार आहेत.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी हा दौरा मैलाचा दगड ठरणार आहे.ज्या गडचिरोलीची ओळख हि नक्सलग्रस्त भूमी म्हणून ओळखली जात होती त्या गडचिरोली ची ओळख आता उद्योगभूमी म्हणून बदलताना पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकीच्या माध्यमातून गडचिरोलीत रोजगार निर्मिती येणाऱ्या कालावधीत होताना पाहायला मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis: स्टील प्लांटची पायाभरणी ते विकासकामांचे उद्घाटन, CM फडणवीसांकडून गडचिरोलीत ऐतिहासिक प्रकल्पांचा शुभारंभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल