फडणवीस यांनी म्हटलं की, आम्ही इतक्या जागा येतील अशी अपेक्षा केली नव्हती. पाच टक्के मतदान जास्त झालं होतं. त्याचे दोन परिणाम येण्याची शक्यता होती. एक दारूण पराभव किंवा मोठा विजय. प्रत्यक्ष राज्यातली परिस्थिती पाहता मला विजय होईल अशी खात्री होती. लाडकी बहीण योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक है तो सेफ है हा नारा आमच्यासाठी जादूई ठरला. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना मला विश्वास होता आणि मी संयमाने काम केलं असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
advertisement
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. महायुतीच्या सरकारबाबत होत असलेल्या चर्चांवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र आहोत आणि एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून आमच्यासोबतच आहेत." मंत्रिमंडळात खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. यावर फडणवीस म्हणाले की, गृह, नगरविकास आणि अर्थ खात्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि यावर रविवारी निर्णय होईल.