गत सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीत देखील काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत चव्हाण यांनी विजय मिळवला. त्यांच्या अकस्मित निधनाने विधानसभेबरोबच नांदेडची पोटनिवडणूक लागली होती. काँग्रेसने दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रविंद चव्हाण यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून डॉ. संतुकराव हंबर्डे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत चाललेल्या थरारनाट्याचा शेवट अखेर काँग्रेस उमेदवाराच्या विजयाने झाला.
advertisement
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे विजयी झालेत. शेवटपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात रवींद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय झाला. विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागा महायुतीने जिंकल्या. मात्र लोकसभेची पोटनिवडणुक काँग्रेसने जिंकली.
जिंकल्यानंतर नवनिर्वाचित काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण म्हणाले, मी नांदेडच्या जनतेचे आभार मानतो. स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचे आशीर्वाद आणि जनतेची साथ यामुळे मला विजय मिळाला , अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात सर्व जागा महायुतीला गेल्या , मात्र काँग्रेसच्या पडत्या काळात स्वर्गीय वसंत चव्हाण यांनी गड राखला होता . त्यामुळे जनतेने आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला साथ दिली असं रविंद चव्हाण म्हणाले. आता माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. नांदेड जिल्ह्यात नव्या जोमाने काँग्रेसला उभे करणार असल्याचे रविंद्र चव्हाण म्हणाले.