काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालाचे पडसाद या अधिवेशनात उमटले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतही वादाचे फटाके फुटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच धुव्वा उडाला. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या काँग्रेसला राज्यात अवघ्या 15 जागांवर यश मिळाले. तर, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, नसीम खान अशा दिग्गज नेत्यांनादेखील पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे काँग्रेसवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
advertisement
काँग्रेसला धक्का, इंडिया आघाडीत बिघाडी...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसला धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालावर काँग्रेसवर तिरकस टिप्पणी करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता काँग्रेसला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप-एनडीएला घेरण्यासाठी इंडिया आघाडीची रणनीती आखली जात आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. तर, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आपल्या खासदारांची स्वतंत्र बैठक बोलावली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याची सूचना पक्षाच्या खासदारांना केली आहे. आज, संसदेत दुपारी तृणमूलच्या खासदारांची बैठक असणार आहे. यावरून आता, तृणमूलने काँग्रेसपासून अंतर राखण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
