TRENDING:

Corona Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढलं टेन्शन, मुख्यमंत्र्यांचं जनतेला महत्त्वाचं आवाहन

Last Updated:

कोरोनाची लाट ओसरलेली असतानाच आता कोविड19 JN.1 च्या नवीन स्ट्रेनने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 21 डिसेंबर : कोरोनाची लाट ओसरलेली असतानाच आता कोविड19 JN.1 च्या नवीन स्ट्रेनने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातही ठाण्यात पहिला रुग्ण आढळला आहे, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढलं टेन्शन, मुख्यमंत्र्यांचं जनतेला महत्त्वाचं आवाहन
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढलं टेन्शन, मुख्यमंत्र्यांचं जनतेला महत्त्वाचं आवाहन
advertisement

ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

advertisement

गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा

आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती घेतली. राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे, आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

advertisement

राज्यात सध्या किती रुग्ण?

सध्या राज्यात 63 हजार विलगीकरण बेड्स, 33 हजार ऑक्सिजन बेड्स, 9 हजार 500 आयसीयू बेड्स आणि 6 हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 45 रुग्ण (मुंबई 27, पुणे 8, ठाणे 8 ,कोल्हापूर 1 रायगड 1) आढळून आले आहेत.

ऑनलाईन माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Corona Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढलं टेन्शन, मुख्यमंत्र्यांचं जनतेला महत्त्वाचं आवाहन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल