जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेतकरी किशोर सोमवारी यांच्याकडे दीड एकर शेत जमीन आहे. कापूस वेचण्यासाठी मजुरांना 12 ते 15 रुपये प्रति किलो या पद्धतीने भाव द्यावा लागत आहे. पावसामुळे कापूस भिजल्याने व्यापारी कापसाला सहा ते सात हजार रुपये एवढाच दर देत आहेत. यामुळे किशोर सोमवारे यांचा उद्रेक पाहायला मिळाला. ओल्या झालेल्या कापसाला काडी तरी लागेल काय.
advertisement
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करू असं सरकार म्हणलं होतं, सरकारने शेतकऱ्यांना चॉकलेट दिले आहे. व्यापारी कापसाला सहा हजार रुपये भाव देत असून त्यातही एक किलो कापूस कट करत आहेत. शेतकऱ्यांना आपलं कारण मांडावं तरी कुणाकडे अशा शब्दात शेतकऱ्याचा संताप पाहायला मिळाला. तर दुसरीकडे कापूस वेचणीसाठी गेल्यानंतर महिलांना कापसाऐवजी कापसाची झाड हाती येत आहे. सतत झालेल्या पावसाने कापसातील फुगलेल्यासारख्यांना कोंब फुटले असून यामुळे कापसाच्या गुणवत्तेत घसरण झाली आहे.
खत औषधांच्या वाढलेल्या किंमती आणि शेतमालाच्या पडलेल्या किंमती यामुळे आम्ही आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसं करावं? असा सवाल छाया भुतेकर या महिला शेतकऱ्याने सरकारला केला आहे.