मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे. रोहिणीकडे २२ तोळे सोनं सापडलं आहे. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन झडती घेतल्यानंतर सोनं, सात जिवंत काडतुसं सापडली आहेत. आठवडाभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यात चोरी झालेलं 30 किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीत सापडलं होतं. आता याच प्रकरणात रोहिणीला अटक केली आहे.
advertisement
रोहिणीच्या सांगण्यावरूनच गाडीत सापडलं होती चांदी
दरम्यान,संभाजीनगर जवळील वाळूजमध्ये संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकून साडे पाच किलो सोनं आणि ३० किलो चांदी दरोडेखोरांनी लुटली. त्याच लुटीतील चांदीबद्दल दरोड्यातील एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर हिनेच पोलिसांना माहिती दिली. अमोलची दुसरी गाडी पडेगाव इथं आहे. पोलिसांनी त्या गाडीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये पोलिसांना चांदी सापडली. दरोड्यातील प्रत्यक्ष दरोडा टाकणारे पाच आरोपी आणि दरोड्यात सहभागी असलेले 7 आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. आरोपींच्या ताब्यातून 32 तोळे सोनं जप्त करण्यात आलं आहे. मात्र, दरोड्यातील साडे पाच किलो सोन्याचा सुगावा पोलिसांना अजून लागला नाही. अमोल खोतकरची मैत्रीण हाफीजा उर्फ खुशी सीआयडीच्या ताब्यातून पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हाच सोन्याचा सुगावा लागू शकेल.
बीड आणि नांदेडमधून २ जणांना अटक
संभाजीनगर दरोड्यातील सोने हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी अंबाजोगाई-नांदेडपर्यंत पाळेमुळे खोदली. अंबाजोगाईतून २ आणि नांदेडमधून एकाा सराफाला अटक केली आहे. मात्र सोनं कुठे आहे हे कळू शकलेलं नाही. एन्काउंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरकडे सोनं होतं, असं इतर आरोपींचं म्हणणं आहे. मग अमोल तर मयत झाला. मग सोनं पोलिसांना सापडतं की, त्याचा कधीच सुगावा लागणार नाही याबाबत कमालीची उत्सुकता आहे.