अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस बघायला मिळत आहे. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी तर स्वबळाचा नारा दिला आहे. यानंतर भाजपनं देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. निवडणुकीच्या रणनीतीबाबत महायुतीत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
दरम्यान, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीत जाऊन ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेकदा अचानक दिल्ली दौरे केले आहेत. दिल्लीत जाऊन ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या भेटी घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा अचानक उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीला गेले. आज ते पुन्हा रिटर्न येण्याची शक्यता आहे. ते दिल्लीला नेमकं कशासाठी गेले? महायुतीत सर्व काही आलबेल नाहीये का? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय.
