याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापनेसाठी लागणाऱ्या लाकडी बांबूच्या टोपल्यांना खूप मागणी असली. यंदा झालेल्या सततच्या पावसामुळे टोपल्यांना बुरशी लागली आहे. त्यामुळे, ग्राहक टोपल्या खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याऐवजी प्लॅस्टिकच्या टोपल्यांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे.
Navratri 2025 : नवरात्रीनिमित्त पुण्यातील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्क भेट द्या
advertisement
नवरात्रौत्सवात घटस्थापनेसाठी वर्षानुवर्षे बांबूपासून तयार केलेल्या टोपल्यांचा वापर केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी बांबूच्या टोपलीत माती भरून त्यात गहू, तांदूळ, मूग यांसारखं पाच प्रकारचं धान्य पेरण्याची परंपरा आहे. नऊ दिवसांच्या कालावधीत याला अंकुर फुटतात. त्यामुळे नवरात्रौत्सवात बांबूच्या टोपल्यांना मागणी असते. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी कल्याणमध्ये मनमाड, नाशिक आणि मुंबई येथून टोपल्या विक्रीसाठी आणल्या जातात.
टोपली विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोपल्यांच्या दरात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 18 रुपयांना विकली जाणारी टोपली यंदा 32 रुपयांपर्यंत विकली जात आहे. सर्वांत मोठी टोपली 400 रुपयांना विकली जात आहे. याशिवाय, नवरात्रीत महत्त्वाचा मानला जाणार गरबा (मातीचं सजवलेलं मडकं) देखील महागला आहे. एक गरबा 200 ते 350 रुपयांना विकला जात आहे.