TRENDING:

'पोळी भाजू नका, तोंड भाजेल', मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर थेट निशाणा

Last Updated:

मराठा समाजाबाबत आम्ही कायम सकारात्मकच आहोत, त्यामुळे मराठा समजाच्या पाठीशी कायम आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज (29 ऑगस्ट) सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. राज्यभरातून विविध मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा साधला आहे. सोयीच्या भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्या, असं आवाहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केले आहे. आंदोलनावर पोळी भाजू नका, तोंड भाजेल', असेही फडणवीस म्हणाले.
Manoj Jarange - Devendra Fadnavis
Manoj Jarange - Devendra Fadnavis
advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन समाज कसे एकमेकांसमोर आले पाहिजे, ओबीसी आणि मराठा भांडण लागलं पाहिजे यासाठी काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. पण माझे त्यांना एकच आवाहन आहे की, आंदोलनावर पोळी भाजण्याचे प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल... शेवटी आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्या निर्णयाचा दीर्घकाळापर्यंत होते. त्यामुळे असे निर्णय सर्वसमावेशक घ्यायचे असतात. वेगवेगळ्या समाजांना झुंजवणे हे सरकारचे धोरण नाही.

advertisement

कायदेशीर मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न :  देवेंद्र फडणवीस

मनोज जरांगे उपोषणाला बसलेत, शासनही सहकार्य करेलच मात्र काही ठिकाणी आंदोलकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. त्याचा फटका वाहतूक कोंडीला बसला. काही जणांमुळे आंदोलनाला गालबोटं लागतं. कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस परवानगीचा सकारात्मक विचार करतील. कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासन सकारात्मक विचार करेल. मराठा आंदोलकांच्या मागण्याबद्दल मार्ग काढण्याचा सरकारचा विचार आहे.  कायदेशीर मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

advertisement

मराठा समाजाबाबत आम्ही कायम सकारात्मक: देवेंद्र फडणवीस

आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. शिक्षण आणि रोजगारच्या गोष्टी आम्ही आमच्या सरकारच्या काळात केल्या आहेत, त्यामुळे मराठा समाजाबाबत आम्ही कायम सकारात्मकच आहोत. मराठा समजाच्या पाठीशी कायम आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत वाढवणार का?

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती.

advertisement

ती मुदत आता एका तासात संपणार आहे. त्यामुळे आता सगळ्या नजरा मुंबई पोलिसांकडे लागल्या आहे. पोलीस आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत वाढवणार का? पोलिसांनी परवानगी नाकारल्यास जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना काही अटीशर्ती घातल्या होत्या. त्यामुळे पोलीस कोणती भूमिका घेणार हे महत्वाचं आहे.

advertisement

हे ही वाचा :

 'आता गाड्या थांबल्या का? मराठा आंदोलनामुळे सरकारची धावपळ; अजित पवारांचा दौंडमधील व्हिडीओ व्हायरल

मराठा आंदोलनामुळे मुंबई लोकलचे तीन तेरा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; घरी परतणाऱ्यांचे होणार हाल

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पोळी भाजू नका, तोंड भाजेल', मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर थेट निशाणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल