मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकरही या भेटीवेळी ठाकरे-फडणवीसांसोबत लिफ्टमध्ये होते. ठाकरे आणि फडणवीसांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर पुन्हा एकदा जुने सहकारी एकत्र येणार का यावरही चर्चा रंगू लागल्या आहेत.
चंद्रकांत पाटलांनी दिलं चॉकलेट
दरम्यान संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ते आले होते. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंचं पुष्षगुच्छ आणि चॉकलेट भेट देऊन स्वागत केलं.
advertisement
या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना पेढा देत अॅडव्हान्समध्ये अभिनंदन केलंय, त्यानंतर तुमचं प्रेम असंच राहू द्या, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना कोपरखळी लगावली. चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन केल्यामुळे मुंबई पदवीधर निवडणुकीत अनिल परबांचा विजय निश्चित आहे का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
‘आता मी आणि देवेंद्र फडणवीस लिफ्टमध्ये एकत्र प्रवास केला. पण एक गाणं आहे ना ना करते प्यार..पण याचा पटोले यांच्याशी काही संबंध नाही. ना ना करते प्यार कर बैठे असं काही नाही. एक योगायोगाने अनौपचारीक भेट होती. पण एक चांगली गोष्ट झाली, भिंतीला कान असतात पण लिफ्टला कान नसतात, त्यामुळे यापुढे गुप्तबैठका या लिफ्टमध्येच घेऊ’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.