धारणी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांच्या खासदार पदाविषयी सूचक वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवणार किंवा मोठी कुठलीतरी जबाबदारी मिळेल अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा काय म्हणाल्या? (Navneet Rana Reaction on Devendra Fadnavis)
advertisement
नवनीत राणा म्हणाले, देवा भाऊ राज्यातील सगळ्या महिलांच्या डोक्यावर हात ठेवून महिलांना विश्वास दिला आहे. सर्व महिलांच्या पाठीशी ते उभे आहेत.भावासमोर बहिणींनी बोलणं काही नवल नाही. यापूर्वी देवा भाऊंनी शायरी केली होती. "मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांध लेना,मै समंदर हू मै फिर लोट के आऊंगा..."मी त्याच पद्धतीने देवा भाऊ समोर माझ मत व्यक्त केलं आहे. मै फिर के आऊंगी.. मी पुन्हा येईल असं म्हटलं यात काही चुकीचं नाही...आणि माझ्या भावाने सांगितलं की माजी खासदार नवनीत राणा या माजी राहणार नाही, असा माझ्या माहेरी येऊन शब्द दिलेला आहे आणि देवा भाऊ हे शब्द पाळणारे आहेत.
लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांच्या या सूचक वक्तव्यामुळे नवनीत राणा यांना मोठे पद मिळेल असं मानलं जात आहे. देवेंद्र फडणवीस भाषणात पुढे म्हणाले की, विरोधक आरोप करत होते की, लाडकी बहीण योजना बंद होणार. पण आम्ही बंद केली नाही. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहणार आहे. आम्ही एकदा येऊन पळून जाणारे लोक नाही.
