TRENDING:

सोलापूर : पोराचं संकट स्वत:वर घेतलं, 6 वर्षांच्या मुलाला वाचवलं, पण बापानं सोडला जीव

Last Updated:

धामणगाव दुमाला येथे डेव्हीड बनसोडे यांनी मुलगा अनुग्रहला पुरातून वाचवताना स्वतःचे प्राण गमावले. बार्शी परिसरात या त्यागामुळे शोककळा पसरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुलावर आलेलं संकट वडिलांनी आपल्यावर ओढवून घेतलं मुलाला वाचवलं अन् त्यांचे प्राण मात्र गेले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. बापानं मुलाला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं. मुलगा वाचला मात्र वडिलांनी जीव सोडला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. धामणगाव दुमाला इथे ६ वर्षांच्या मुलाला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
News18
News18
advertisement

वडिलांच्या त्यागामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले, मात्र काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी धामणगाव दुमाला येथील नागझरी नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ घडली. अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डेव्हीड बनसोडे हे त्यांचा ६ वर्षांचा मुलगा अनुग्रह याच्यासोबत नदी आणि बंधारा पाहण्यासाठी गेले होते.

advertisement

नदीचे पाणी वाढलेले असताना अनुग्रहचा पाय घसरला आणि तो अचानक पुराच्या पाण्यात पडला. मुलाला पाण्यात पडलेले पाहताच क्षणाचाही विलंब न करता वडील डेव्हीड बनसोडे यांनी पाण्यात उडी घेतली. त्यांनी अनुग्रहला पाण्याबाहेर ढकलून त्याचा जीव वाचवला. मात्र, पाण्याचा प्रवाह खूप जोरदार असल्याने आणि स्वतःला व्यवस्थित पोहता येत नसल्याने डेव्हीड बनसोडे गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहात बुडाले.

advertisement

यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी डेव्हीड यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. डेव्हीड यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तातडीने बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, वडिलांच्या त्यागामुळे वाचलेल्या चिमुकल्या अनुग्रहला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 रुपयांला खरेदी करा अन् 30 ला विका, दिवाळीत करा आकर्षक लायटिंग व्यवसाय
सर्व पहा

वडिलांनी मुलाला जीवदान देण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. बार्शीत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, एका पित्याच्या या अद्वितीय त्यागाला सलाम केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूर : पोराचं संकट स्वत:वर घेतलं, 6 वर्षांच्या मुलाला वाचवलं, पण बापानं सोडला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल