डीजेच्या आवाजामुळे लोकांचे कान बधीर होण्याची वेळ आलेली असताना हा आवाज काही केल्या कमी होत नव्हता. उलट मोठ्या आवाजात रिमिक्स गाणी लावूनत मिरवणुकीत तरुण अश्लील हावभाव करत नाचत होते, धिंगाणा घालत होते.
यावेळी समाज माध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि नागरिकांनी तक्रारी दिल्यावर पोलिसांनी जुजबी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांची कारवाई करायला सुरुवात करताच मिरवणूक काढणाऱ्या आयोजकांनी डीजे घेऊन पळ काढला. मात्र डीजे लावताना पोलिसांची परवानगी होती का? परवानगी नव्हती तर मग पोलिसांनी हे डीजे लावू कसे काय दिले? लावले असतील तर यावर कोणती कार्यवाही करणार? आपण ज्या उद्देशासाठी ह्या मिरवणुका काढतो तो उद्देश या मिरवणुकीतून सफल होतो का? असा प्रश्न कळंब शहरातील संतप्त नागरिकांनी विचारला असून आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 11, 2025 10:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिव पोलिसांच्या DJ बंदी नियमाला खुलेआम हरताळ, अश्लील हावभाव करून तरुणांचा धिंगाणा