मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादात बाहेरच्या काही तरुणांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती चिघळली. पाहता पाहता दोन गट समोरासमोर आले आणि परिसरात कोयता-कातीने हाणामारी सुरू झाली.
या हाणामारीत चैतन्य शेळके हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर वाळू तस्करी, बंदूक लावून धमकावणे यांसारखे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. तसेच तो धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतून तडीपार असल्याची देखील माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना उपचारासाठी दाखल केले. नेमके भांडण कोणत्या कारणावरून झाले, त्यात किती तरुण सहभागी होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परंडा शहरासह महाविद्यालयीन परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.