कळंब तालुक्यातील इटकूर गावात आज सकाळी काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. श्रीकांत लिंबराज गंभीरे (वय 36) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. इटकूर गावातील बाजार मैदानात श्रीकांतने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले.
ही घटना गुरूवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
या घटनेमुळे संपूर्ण गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कौटुंबिक तणावातून की कर्जबाजारीपणामुळे श्रीकांत गंभीरे यांनी टोकाचे पाऊल उचलले. यासंदर्भातील तपास पोलीस करीत आहे.
