धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भर बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांचा बाप आणि लाज काढल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी तुळजापूर आणि परांडा या तालुक्यातील काम मंजुरीसाठी पुढे पाठवली. ती कामे मंजूर करताना त्यांनी आपल्याला विचारात घेतले नसल्याचा आरोप खासदार ओम राजे निंबाळकर यांचा आहे.
केवळ सत्ताधाऱ्यांचीच कामे करणार का? विरोधकांची कामे करणार नाहीत का?
advertisement
मी येण्याच्या आधीच यादी तयार झाली होती, असे उत्तर अधिकाऱ्याने ओमराजे यांना दिल्यावर त्यांना राग अनावर झाला. मग यादी मला दाखवायला तुम्हाला काय लाज वाटत होती का? तुम्ही केवळ सत्ताधाऱ्यांचीच कामे करणार का? विरोधकांची कामे करणार नाहीत का? तुम्ही जनतेचे नोकर आहात ना? स्वत:ला संविधानापेक्षा मोठे समजता काय? अशा प्रश्नांची सरबत्ती ओम राजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यावर करीत त्यांना चांगलेच सुनावले.
तुम्हाला बघतोच, हक्कभंगाची कारवाई करतो, ओमराजेंनी अधिकाऱ्याला दम दिला
एवढेच नाही तर मला तुम्ही विचारात घेतले नाही, मी तुम्हाला बघून घेतो, असे म्हणत आपण हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी भर बैठकीत अधिकाऱ्याला दिला. दरम्यान, खासदार ओम राजे निंबाळकर यांचा ही चित्रफीत समाज माध्यमांवर चांगलीच वेगाने पसरली.