उपरोक्त घटनेसंदर्भात आम्ही नळदुर्ग पोलिसांना विचारले असता, या घटनेसंदर्भात आम्ही सीसीटीव्ही फुटेजद्वारे योग्य तपास करत असून घटनेत वस्तुस्थिती आढळून आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासन नळदुर्ग पोलिसांनी दिले आहे.
दरम्यान माहितीनुसार, काल नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत काही व्यक्तींनी अचानक औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. उपस्थितांपैकी काहींनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला, जो काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
advertisement
मुस्लीम समाजाचा पवित्र असा सण अर्थात मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी होता. तर ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होते. त्यामुळे ५ तारखेची मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक अनेक ठिकाणी ८ सप्टेंबर रोजी काढण्या आली. राज्यात बंधुभाव व हिंदू मुस्लीम एकोपा अबाधित राखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद आणि मिरवणूक सोमवारी काढली.