TRENDING:

Dharashiv: भावजयसोबत अनैतिक संबंध, पुतण्याचा अडसर, चुलत्याने कुऱ्हाडीने वार करून संपवलं

Last Updated:

Dharashiv News: भावजयसोबत अनैतिक संबंध अडसर ठरणाऱ्या पुतण्याचा चुलत्याने कुऱ्हाडीने वार करत खून केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरपळ, प्रतिनिधी, धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीर आणि भावजयी यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती वडिलांपर्यंत पोहोचवत असल्याच्या रागातून एका निर्दयी चुलत्याने आपल्या १३ वर्षीय पुतण्याचा १ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
धाराशिव हत्या प्रकरण
धाराशिव हत्या प्रकरण
advertisement

या घटनेने तुळजापुरात आणि धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एक जानेवारीला तलावातली मोटर काढायची म्हणून बोलवले आणि तिथेच आरोपी ओमकार कांबळे याने आपला पुतण्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला. प्रेत तेथेच टाकून तो निघून आला.

चार दिवसानंतर गुराख्याने ही घटना बघितल्यानंतर हा खून उघडकीस आला. आरोपीला तामलवाडी पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर २४ तासातच ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यास दि. १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

नेमकी घटना काय?

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारातील कदम यांची शेती दत्ता कोरे हे बटईने करतात. या शेतात उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील ओमकार देवीदास कांबळे हा त्याच्या भावाची पत्नी (भावजय) ज्योती कांबळे हिच्यासह शेतात सालगडी म्हणून काम करत होता. ज्योती कांबळे यांचा १३ वर्षीय मुलगा कृष्णा उर्फ सदानंद कांबळे हा देखील कधी वडिलांकडे तर कधी आईकडे सोबत राहत होता. कृष्णा यास आई ज्योती आणि चुलता ओमकार यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती झाली होती. हीच माहिती आपल्या वडिलांना देत रागातून चुलत्याने पुतण्याचा अडसर दूर केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

१ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास आरोपी ओमकार कांबळे याने तलावातील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने कृष्णाला तामलवाडी साठवण तलावाजवळ नेले. तेथेही कुऱ्हाडीचे सपासप वार करून या चिमुकल्याचा चुलता ओमकारने निघून खून करत त्याचा मृतदेह तलावाशेजारील गवतामध्ये फेकून तो पसार झाला. त्यानंतर चार दिवस उलटले तरी कृष्णाचा पत्ता नसताना कोणताच बोबाटा झाला नव्हता. तलाव परिसरात धनाजी नेटके हे आपली जनावरे चारत असताना गवतामधून त्यांना मृतदेहाचे पाय दिसून आले. त्यावेळी त्यांनी तामलवाडी पोलीस स्टेशनला संपर्क केला असता हा सगळा खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv: भावजयसोबत अनैतिक संबंध, पुतण्याचा अडसर, चुलत्याने कुऱ्हाडीने वार करून संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल