TRENDING:

शिस्तीत कार्यक्रम होणार, राणा पाटलांचा खासदार ओमराजेंना कडक इशारा, त्या गोंधळाचंही समर्थन

Last Updated:

Dharashiv: धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : धाराशिवच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत मल्हार पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वादावर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अखेर मौन सोडले. शिस्तबद्ध मिरवणुकीत सगळे शिस्तबद्ध झाले, पुढील काळात सगळे शिस्तबद्ध होईल, असे सूचक वक्तव्य करीत आमदार राणा पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना इशारा दिला. दुसरीकडे मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या समर्थनही केले.
ओमराजे निंबाळकर-राणा जगजीतसिंह पाटील
ओमराजे निंबाळकर-राणा जगजीतसिंह पाटील
advertisement

धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या मिरवणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर शेरेबाजी करीत आणि गाण्यांच्या माध्यमातून डिवचले होते. एवढेच नाही तर ओमराजे निंबाळकर यांना पाहून मल्हार पाटील यांनी हात उंचावत कार्यकर्त्यांनी दंड देखील थोपटले होते.

advertisement

पुढील काळात सगळा कार्यक्रम शिस्तीत होईल, ओमराजेंना इशारा

या गोंधळावर अखेर राणा जगजितसिंह पाटील यांनी मौन सोडले असून शिस्तबद्ध मिरवणुकीत सगळे काही शिस्तबद्ध झाले, यापुढेही सगळे शिस्तबद्ध होईल असे म्हणत त्यांनी पुत्र मल्हार पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाला अप्रत्यक्षपणे समर्थन दिले असून पुढील काळात सगळा कार्यक्रम शिस्तीत होईल असे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांना इशारा दिला आहे.

advertisement

ओमराजे राणा पाटलांना काय प्रत्युत्तर देणार?

पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राणा पाटील बोलत असताना त्यांनी ओमराजेंना इशारा दिला.आता राणा पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार ओमराजे निंबाळकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिस्तीत कार्यक्रम होणार, राणा पाटलांचा खासदार ओमराजेंना कडक इशारा, त्या गोंधळाचंही समर्थन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल